Marathi Ukhane For Female
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, …….. रावांचे नाव घेते सात जन्मासाठी

चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात, …….. रावांचे नाव घेते, पावसाची झाली सुरवात.

आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा …….. रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा

फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे …….. रावांच्या सुखात माझे सुख असावे.

Modern Marathi Ukhane For Female
पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …….. रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वां कारिता

मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे, … रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, … रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.

Ukhane Marathi For Female
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, .. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते———- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात, … रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले, … रावांचे हेच रुप मला फार आवडले.
Traditional Ukhane In Marathi For Female
चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती, …रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.
नव्या आयुष्याची नवी नवी गाणी——— च्या घराण्यात ———- रावांची झाले मी राणी
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … रावांचे नांव घेते, सारे जण बसा.
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांच्या नांवाचा, भरला हिरवा चुडा.
Ukhane In Marathi For Female
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात, …रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.
दारी होता टेबल, त्यावर होता फोन, … रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?
Marathi Ukhane
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, …रावांच्या संसारात टाकते मी पहीले पाऊल.
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा, … रांवाच्या सुख दुःखात अर्धा माझा वाटा.
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, … रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
जमले आहेत सगळे, ….. च्या दारात… ….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
Ukhane Marathi
सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, …… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ……….- बसले दारात मी जाऊ कशी घरात
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल… ….. च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल
Ukhane In Marathi For Female
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… ….. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
माहेरी साठवले, मायेचे मोती… ….. च नाव घेऊन, जोडते नवी नाती
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात… ….. रावांचे नाव घेते, …..च्या दारात
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती.
Marathi Ukhane For Female Funny
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.
कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
Ukhane In Marathi Comedy
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, … रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.
पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.
ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.
Funny Marathi Ukhane
कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, … रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.
यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.
अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा, … रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा.
Funny Ukhane Marathi
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, … रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, … राव हेच माझे अलंकार खरे.
पुजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, … रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.
Marathi Marriage Ukhane
सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन …….. रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण
एका वर्षात महिने असतात बारा, …….. रावांच्या नावातच समावला आहे आनंद माझा सारा.
सावित्रीने नवस केले-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, … रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.
Marathi Ukhane For Bride
श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, … रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, … रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.
घातली मी वरमाला हसले… राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
Haldi Kunku Ukhane
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, घडविले देवानी… रावांना जीव लावून.
धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.
नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन, …रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन.
नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर, आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर.
सोपे उखाणे
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, … रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार.
पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, … रावांनी आणला मला मोग-याचा गजरा.
चांदीचे जोडवे पतीची खुन, .. रावांचे नांव घेते,… ची सुन.
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.
मराठी उखाणे नवरी साठी
ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला, … रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.
अंगणात होती मेथी, पाणी घालु किती, … रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. … रावांचे नांव घेते… च्या दिवशी.
वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, …रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,
25 नवीन उखाणे
गृह कामाचे शिक्षण देते माता, …रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.
दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे, … रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.
पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला, … रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.
नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे, …रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
बायकांचे उखाणे
स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी, …रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.
…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा, त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.
तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले, …रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.
केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल, … राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.
नावाचे उखाणे
आज सारे सुख माझ्या दारी दाटले, …रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.
मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, …राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.
सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा, …रावामुळेच लागला मला त्याचा लळा.
शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन, …रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.
लग्नाचे उखाणे
इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग, …रावांच्या संसारात मी आहे हंग.
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश, …रावांवर आहे माझा विश्वास.
प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे, …रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.
प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची, …रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.
मराठी उखाणे
नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, … रावांचा स्वभाव आहे फारच उदार.
करवंदाची साल चंदनाचे खोड, … रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.
सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, … रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा …रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.
Funny Ukhane In Marathi For Female
सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.
गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट, …रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.
New Ukhane Marathi
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, आता ….राव माझे जीवनसाथी.
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर, …रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
Long Ukhane In Marathi For Female
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, …रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन, …रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.
नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद , …रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!”
Mothe Ukhane In Marathi
“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, …चे नाव घेते तुमच्या साठी!”
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.
दही, दूध, तूप आणि लोणी… …….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी
Marathi Ukhane For Sankranti
आभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक …….. रावांचे नाव घेते …….. ची लेक
पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड, तिन्ही सांजेला मनाला लागे …….. रावांची ओढ.
बसली होती दारात, नजर गेली आकाशात …….. …….. रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात
Sankranti Ukhane
मंगल दिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचा बांधतात तोरण …….. रावांचे नाव घायला …….. च कारण
तांब्याच्या पळीवर नागाची खून, …….. रावांचा नाव घेते…….. ची सून.
आई वडीलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात.. हसतमुखाने प्रवेश केला मी …….. रावांच्या जीवनात.
Sankranti Ukhane Marathi
पेटी वाजे तबला वाजे मंजुळ वाजे बासरी …….. रावांच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी
तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण, …….. नाव घेते …….. ची सून
सुंदर माझे घर त्यात …….. रावांचा मधुर स्वर दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.
Satyanarayan Pooja Ukhane
सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा, सात जन्म …….. राव माझे पति राहो हीच माझी इच्छा.
जीवनाच्या सागरात पती पत्नी ची नौका …….. रावांच नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका
खाण तशी माती …….. राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती
Ukhane For Wife
कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज, …….. रावांचे नाव घेते, वटपोर्णिमा आहे आज.
महादेवाच्या मंदिरात बेल वाहते वाकून …….. रावांच नाव घेते तुमचा मान राखून
लाल मणि तोडले काळे मणि जोडले …….. रावांनसाठी आई वडिल सोडले
Marathi Ukhane For Female Romantic
पीडयावर पीडे पाच पिडे …….. रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुडे
ताटभर दगिन्यांपेक्षा माणस असावी घरभर, …….. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, …….. राव गेले कामाला म्हणून मला नाही करमत
Latest Marathi Ukhane
रंगीत कपाटात जापानी बाहुली, …….. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली
मुबई ते पुणे पेरला होता लसून, …….. राव गेले थकून, आणा त्यांना पालाखित बसून.
खोक्यात खोका टिव्ही चा खोका, गप्प बसा नाहीतर देईन ठोसा
Marathi Ukhane For Wife
बागेत फूल गुलाबाचे, माझ्या मनात नाम …….. रावांचे
सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा, …….. रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा
घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस, …….. रावांच्या आयुष्यात चढवीन आनंदाचा कळस
Navriche Ukhane Marathi
केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन, …….. रावांचे नाव घेते …….. ची सून.
कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती, …….. राव माझे पति मि त्यांची सौभाग्यवती.
चांदीचे ताट त्यात जेवायचा जावयाचा थाट …….. रावांचे नाव घ्यायला लागतात रूपए तिनशे साठ
Naav Ghene In Marathi For Female
नदीला आला पूर समुद्राची झाली भरती …….. राव बसले पलंगावरती मी करते त्यांची आरती
खुर्चीत खुर्ची अन् …….. रावांची बहीण लवंगी मिर्ची
केळी देते सोलून पेरू देते चिरून, …….. स्वामींच्या जिवावर कुंकू लावते कोरुन.
Ukhane For Female
लसणात लसून गावरान लसून …….. रावांची राणी म्हणते मी …….. ची सुन
परिजताकाच्या झाडा खाली हरिण घेतो विसावा, …….. रावांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असावा..
तांदळाच्या भाकरीवर अंड्याचा पोळा …….. रावांच्या शेजारणीवर डोळा
चांगले उखाणे
ताज महल बनविताना कारागीर होते कुशल …….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
मोहिनी माझं नाव येवला माझं गाव …….. रावांच नाव घेते पाटील माझं आडनाव.
तुलसी माते तुलसी माते वन्दन करते तुला, …….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहुदे मला.
लिहिलेले उखाणे
नवरात्रित लावते अखंड दिवा …….. रावांसाठी नेहमीच करत राहीन सेवा.
नवरात्रीच्या नऊ माळा, दहावी माळ म्हणजे दसरा …….. रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा.
मोगऱ्याचा गजरा लावते मी वेणीला …….. रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला.
मोठे उखाणे
छोट्याश्या वाटीत घास भरवे बाळाला, …….. रावांचे नाव घेताना लाज कसली जिवाला
माणित मणी काळे मणी …….. राव माझ्या मनाचे धनी
आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा … ….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा
हसायचे उखाणे
शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड ….. चे नाव घेते….. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड…..
श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा, ….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल ….. राव एकदम ब्यूटिफुल
मराठी उखाणे टाईमपास
नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार, ….. बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार…..!!
पुढे जाते वासरू, मागून येते गाय ….. ला आवडते नेहमी दुधावारची साय
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, ….. ची व माझी जडली प्रिती
उखाणे मराठी
साखरेचे पोते सुई ने उसवले, ….. ने मला पावडर लाऊन फसवले
हळद असते पिवळी, कुंकु असते लाल ….. रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल
सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून ….. चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन
उखाणे मराठी कॉमेडी
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’, ….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे, ….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे
परातीत परात चांदीचा परात, …. राव हागले दारात, जाऊ कशी घरात
उखाणा
तांदुळ निवडत बसले होते दारात ते पादले दारात आणि वास आला घरात
प्रसन्न वदनाने आले रविराज ….. ने चालविला संसारात स्नेहचा सांज
कपात दुध दुधावर साय ….. च नाव घेते ….. ची माय
हळदीचे उखाणे
काचेच्या ग्लासात कोकम सरबत ….रावां शिवाय मला नाही करमत
Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी ….. ला लागली ५०००० ची लॉटरी
होळी रे होळी ….. पुरणाची पोळी ….. …….. च्या पोटात बंदुकीची गोळी …
रुखवताचे उखाणे
हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर ….. रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर
ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन …. माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, …. माझी बायको आहे मोठी लुच्ची
विनोदी उखाणे
नागाला पाजत होते दूध आणि साखर ….. रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर
पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात ….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात…
मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण …. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण
हसायचे उखाणे
चंदनी पानात मुग्ध कळी हसली ….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी ….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया ….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान …. चे नाव घेते राखते तुमचा मान
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा, ….. च्या जीवावर करते मी मजा
Marathi Ukhane For Female | उखाणे नवरी साठी
आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा …….. रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा
कर्ण ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, …….. रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर.