Suvichar Marathi | सुविचार मराठी
खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो

केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं


कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल

जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार

Suvichar Marathi
नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका असे करून स्वतःची किंमत कमी होते

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरुर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपो आप बनत जात

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे काही विसरायला तयार असते

काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असत कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही

Marathi Suvichar
नाती ही झाडच्या पानांसारखी असतात एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते
सुखासाठी कधी हसावं लागंत तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं
अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा
Success Marathi Suvichar
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो
आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
आयुष्य जगून समजते केवळ ऎकून वाचून बघून समजत नाही
आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
Suvichar In Marathi
आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथेच सोडून जायचे आहे
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ते आपल्याजवळ नसते
सुख हे फुलपाखरा सारखे असते पाठलाग केला तर उडुन जात बळजबरी केली तर मरून जात निरपक्ष:पणे काम करत राहील तर अलगत येउन मनगटा वर येउन बसते
Life Suvichar Marathi
आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे
जो आनंदी राहतो तो इतरांपण आनंदी करतो
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो
दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झर्यावर राजहंस
Life Marathi Suvichar
खरी श्रीमंती शरीराची बुध्दीची आणि मनाची
अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो
अन्यायापुढे मान झुकवू नका स्वाभिमानाने लढा फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका जातीपाती सोडून द्या
आपण जे पेरतो तेच उगवतं
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो
Inspirational Marathi Suvichar
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील
अंथरूण बघून पाय पसरा
अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा
आतील जग हे बाहेरच्या जगापेक्षा विशाल आहे
Marathi Suvichar Short
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा
उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो
ऎकावे जनाचे करावे मनाचे
एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा
Marathi Suvichar Images
कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते
खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय
अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव
एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करून काय उपयोग कारण ती केव्हा ना केव्हा सुटणारच एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल तरीही चिंता करून काय उपयोग कारण ती कधी सुटणारच नाही
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता हे तुमचे कर्म
सुविचार मराठी
भीतीला टाळाल तर ती वाढत जाते भीतीचा सामना कराल तर ती पळून जाते
समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडून जावू द्या
कठीण काळ कायम टिकाऊ नसतो पण कठीण लोक असतात
मुर्खाचे हृदय जिभेवर असते शहाण्याची जीभ हृदयात असते
चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही
सुविचार मराठी छोटे
अपयश कायम नसते यश सुद्धा
पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा तो पैसा स्वतः कमावेल पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा तो मिळालेला पैसा गमावेल
दिलेले वचन एखाद्या घेतलेल्या कर्जासारखेच आहे
लोक तुमचा सल्ला मानत कधीच नाहीत ते तुमचे उदाहरण घेतात
प्रशंसा स्वीकारायला आणि करायला शिका
सुंदर सुविचार मराठी
एखाद्या कृतीमध्ये पाप नसते त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत नाही का
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही
तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन किर्ती आणि वैभव हे चालत येते
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
चांगले सुविचार
काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच
कलेची पारंबी माणसाला बळ देते
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही
कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्न करण्यास कुचराई करु नका
काळ हे फार मोठे औषध आहे मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्या होतात
आत्मविश्वास सुविचार मराठी
जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे
जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फ़लेषु कदाचन
जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही
Suvichar Marathi Status
शहाणा माणूस चुका विसरतो पण त्याची कारणे नाही
चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही
न मागता देतो तोच खरा दानी
हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते
Suvichar Marathi Image
खरे आहे तेच बोला उदात्त आहे तेच लिहा उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा
शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय
जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे
अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप
Good Morning Marathi Suvichar
आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते
आरश्याला हृदय नसत पण कल्पना मात्र बरयाच असतात
त्येक वस्तुत सौंदर्य असत पण ते सर्वाना दिसत नाही
जिथे प्रेम कमी असते तिथे दोष दिसू लागतात
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्तप्रेम करतो तिच्या शेजारी बसणे आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे
Marathi Suvichar Status
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऎवजी फक्त विचारच करत बसतो
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुखवू जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते
एक प्रेमळ प्रश्न अश्रू पुसणारा हृदया जवळ असतो कि अश्रू देणारा
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो
एखाद्याचे बोलणे मनावर आघात करते पण मौन शब्दांपेक्शा मोठा आघात करते
Marathi Suvichar For Students
पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते त्या सुखाचे नाव उत्साह
अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे
स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे
Suvichar Marathi Short
शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे
जीवनात सुखाचे दु:खाचे यशाचे अपयशाचे आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदाकदाचित समजा ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं
10 Suvichar In Marathi
आयुष्यात कुटुंब कामाचं ठिकाण नातेवाईक समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात संकटं टाळता येणं शक्य नाही पण पण दु:ख टाळता येणं शक्य आहे एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते
दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो
मनाला आंनद संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे
पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये
Suvichar Marathi Madhe
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही
उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रात्र
असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे
Suvichar In Marathi Text
राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी
श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते
एकमेका साहय्य करू अवघे धरू सुपंथ
Suvichar Marathi Suvichar
जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे
दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो
ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही स्वस्थ राहण्याने मात्र होते
Suvichar Marathi For Students
बनू शकलात तर कृतज्ञ बना कृतघ्न नको
शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते पण त्यासाठी संयम असावा लागतो
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे
Suvichar Marathi New
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
ज्या जखमेतून रक्त येत नाही समजुन जायचे कि तो घाव जवळच्याच कोणाचातरी आहे
नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते
Suvichar In Marathi Small
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते अस नसते आपल्या कडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो
आयुष्यात अचूक व योग्य निर्णय घेणयाची क्षमता अनुभवातुन येत असते काहीवेळेस माञ अनपेक्षित अनुभव हा बहुतेकदा चुकीच्या माणसा पासुन व निर्णयातून पण येत असतो
दुसर्याच्या आयुष्याला सुखाची चादर दयावी पण आपल्या खुशी साठी दुसर्याची चादर खेचु नये
रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात
Small Suvichar In Marathi
जरी झाडाची पाने गळाली तर त्यांची जागा दुसरी पाने नव्याने घेतात
भावनांचं मोल जाणा मोठेपणात हरवू नका आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
कमीपणा मानू नका व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका मिळेल तितकं घेत रहा जमेल तितकं देत रहा
समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या नातं म्हणजे ओझं नाही मनापासून उमजून घ्या
Suvichar Marathi Suvichar
विश्वासाचे चार शब्दं दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक नातं जपा मध्येच माघार घेऊ नका
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने राज्य करतात
क्षण जीवनातले समृध्दिने दिव्यासह उजळून यावे नाते आपले परस्परातले अगदी अतुट राहावे
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात
In Marathi Suvichar
जेव्हा आपण दुचाकी वरून तिघेजण जात असतो तितक्यात कुणीतरी हाक मारून सांगत कि अरे पुढे पोलीस आहेत अस अनोळखी व्यक्तीने सांगण म्हणजे माणुसकी
गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो
कधी कधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्याच जिव्हाळाच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकवावी लागतात जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसाच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतं
आपल्या सावली पासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे
मराठी सुविचार आयुष्याबद्दल
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल मी दुनियेबरोबर लढु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांबरोबर मला जिकांयचे नाही तर जगायचे आहे
डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत
खाल्ल्यावरच तिची चव कळते तसेच नुसतेच नाते आहे सांगून भागत नाही तर ते टिकवायला लागतं
या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते
नवीन सुविचार मराठी
जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा तुमच्यातल्या नात्याला कापू नका
चूक ही आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते
आवडत्या व्यक्तीला जितके क्षण द्यालते असे द्या कि तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील
सुविचार मराठी छोटे 50
आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो
दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका वाटू शकलात तर आपला आनंद वाटा लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे
आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका
मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय
200 मराठी सुविचार
आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम् मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडुन टाका संकटे ही क्षणभंगुर आहेत त्यांचा सामना करा आठवणी या चिरंतन आहेत त्यांना ह्रदयात साठवून ठेवा
ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे
जीवन चहा बनवण्यासारखे आहे अहंकाराला उकळू द्या चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या दु:खांना विरघळून जाऊ द्या चुकांना गळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या
आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा- तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते
100 मराठी सुविचार
जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खाशी खेळायला शिका
हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटाना समोर जाण्यासाठी.मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी
आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य
शालेय सुविचार मराठी छोटे
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो
आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात
आयुष्यात पैसा म्हणजे सर्वकाही नाही असं म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा
प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका
आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते
सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण
आयुष्यात बऱ्याच वेळा आपण ज्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत त्या विसरून जातो आणि ज्या गोष्टी विसरून जायच्या आहेत त्या लक्ष्यात ठेवतो
नुसत दु:ख होवून उपयोगी नाही ते तितक्याच तीव्रतेने मांडता आलं पाहिजे दु:खावर काळ हे जरी औषध असलं तरी सांत्वनकारसाठी ते ताज ठेवायलाच हवं
बाणेदार माणसालाच बाणेदारपणाची किंमत किती मोजावी लागते ते समजतं अशा वेळी डोळ्यातून येवू पाहणाऱ्या पाण्याला सांत्वन नको असतं स्वताचा पराभव जेव्हा स्वतःजवळही मान