ज्या नात्यात विश्वास आहे ते नातं कधीच तुटणार नाही
नाती ही झाडांच्या पानांसारखी असतात एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते
नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते
कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी होण्यासाठी आधार देतं
आपलं कुटुंब हीच प्रत्येक व्यक्तीची खरी ताकत असते
यशस्वी तोच होतो जो आपल्या परिवारा सोबत असतो
कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा महत्त्वपूर्ण काहीच नाही
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत
विश्वासाचे चार शब्दं दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक नातं जपा मध्येच माघार घेऊ नका
कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही
तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता
कुटुंबाचं प्रेम हा ह्या जगातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे
कुटुंब हे झाडासारखं असतं जे कडक उन्हात सावली देतं
कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून लांब गेल्यावरच कळतं
प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचं सुखी कुटुंब असतं
कितिही मतभेद असून सुद्धा जे एकत्र प्रेमाने आनंदाने राहतात ते म्हणजे कुटुंब
जगातील सर्वात मोठा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे
संपूर्ण जगात कुटुंबच ही अशी एक जागा आहे जिथे माणसाला शांतता आणि आनंद मिळतो
जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल
कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे सहाय्यक आहेत
कुटुंब ही मानव समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे
इतर गोष्टी बदलता येतात पण आपली सुरूवात आणि अंत हा कुटुंबासमवेतच होतो
पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो
मातीचं मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त ते बनवणाऱ्यालाच माहीती असते तोडण्याऱ्याला नाही
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरुर ठेवा कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात
कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो
आपले नाते हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधीही नसावे कारण समुद्राच्या लाटा ह्या एक दोन मिनिट आनंद देऊन पुन्हा निघून जातात
नाते तोडणे हे खूप सोपे असते पण ते जपणे आणि टिकवणे हे खूप अवघड असते
एक गैरसमज एका सुंदर प्रेमळ नात्याचा शेवट करू शकतो
कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे त्यामुळे तो नेहमी जपून वापरा
कुटुंब हे देवाने दिलेलं असं वरदान आहे जे आयुष्यातील कोणत्याही संकटात तुम्हाला साथ देणारच
तुम्ही मदत न मागता जे प्रत्येक संकटात तुमच्या सोबत असतात तेच तुमचे कुटुंब असते
काही लोक पैशाला आपले कुटुंब समजून आयुष्यातील सर्वात मोती चूक करतात
आपल्या आयुष्यातील आपण अनेक गोष्टी बदलतात पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात कुटुंब आणि आपली नाती कधीच बदलत नाही
तुम्ही जगाच्या पाटीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला तुमच्या परिवाराची आठवण नक्की येईल
कधीही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनात पडलेल्या अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळत सुद्धा नाही
आपल्या जीवनातील इतर कोणत्याही गोष्टी बदलता येतात पण आपली सुरूवात आणि आपला शेवट हा कुटुंबासोबतच होतो
जगातील कुठल्याही बाजारात जा चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे
घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात
तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो
कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी माणसाला दिली देन आहे
आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे
कुटुंब ही अशी जागा आहे जिथे देशाला आशा मिळते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात
घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवणं यापेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही
जगात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट कुटुंब आणि प्रेम आहे
नाती जपणं ही एक कला आहे जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकेल
तुम्ही कुठेही गेलात अगदी स्वर्गात जरी गेलात तरी तुमच्या कुटुंबाची आठवण नक्की काढाल
कोणत्याही व्यक्तीने व्यवसायासाठी आपल्या कुटुंबाला निराश करू नये
आपल्या कुटुंबासोबत पृथ्वीवर सुंदर जीवनाचा आनंद घ्या
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही
आपल्या चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार कुटुंबाला जोडून ठेवतात आणि स्वर्गसमान बनवतात
कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते
संयम आपल्या चरित्राची किंमत वाढवतो तर मित्र आणि कुटुंब आपल्या आयुष्याची किंमत वाढवतात
कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं
आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात
कागदाला जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते तसंच कुटुंबातील ती व्यक्ती प्रत्येकालाच खुपते जी कुटुंबाला जोडून ठेवते
कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो
कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ आणि आनंदात घालवल्याने बनतं
तुमच्या कुटुंबाने जे तुमच्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांच्यासाठी करा
कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे आपण मनाने एकमेकांच्या संपर्कात येतो
आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही
कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळतंही नाही
कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं भांडण काही मिनिटात संपत पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात
आपला अहंकार दाखवून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नातं जोडून ठेवण्यात खरं यश आहे
प्रत्येक कुटुंबाबाबत आणि नात्याबाबत काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि केल्या तर ते नातं आणि कुटुंबही नेहमी आनंदी राहील
जर तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी भक्कम पने उभे असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणे खूप सोपे होऊन जाते
कुटुंबात प्रेम माया आणि ममता असते जिथे कशाचीही उणीव नसते तिथे दुःखाला अन संकटाना कधीही थारा नसतो तिथे
खूप नम्रता हवी वागण्यात नाती जपण्यासाठी छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जात होते ह्या जगात नाही
कोणतीही अगाध संपत्ती नको ना कोणती ओळख हवीयं एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असू दे
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आणि त्यांना विसरण्यात आहे कारण एकही चूक नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील
कधी कधी खूप दूर जावं लागतं आपलं जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी
प्रत्येक व्यक्ती कढून प्रेम आणि जीवाळा मिळू शकतो फक्त ती व्यक्ती निस्वार्थी असली पाहिजे
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा
मी असं म्हणत नाही की आयुष्यभर साथ असु द्या पण जोपर्यंत आहे तोपर्यंत पाठीवरती हाथ राहू द्या
आरसा आणि हृदय दोन्ही तसे सारखेच असतात पण आरश्यात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात
कोणत्याही नात्या मध्ये कधीच game खेळायची नाय कारण game कधी पण over होत असते
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही
जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात जितके जास्त जपाल तितके आपणाला दूर लोटतात
आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आई – बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य आणि त्याच कारण तुम्ही स्वता असणे
कितीही मोठी चूक करा सर्वे सोडून जातील साथ फक्त कुटुंबच सोबत असतो प्रत्येक परिस्थितीत
नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात
सुरवातीला कधीही न आवडणारे नातं जेव्हा काही काळाने आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते ते नातं इतर नात्यांपेक्षा कणभर सरस असते
नात्यात माणसं जरी वेगवेगळी असली तरी त्यांच्यामधील विश्वासाचे घट्ट बंध महत्वाचे असतात
नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतील तेव्हा दुःख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेदना जाणवतं नाहीत
चूक माझी नसतानाही मी माफी मागायला तयार आहे तुटणारं नातं जपायला माघार घ्यायला तयार आहे
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चुक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून
खूप लोकं भेटली मला आपलं आपलं म्हणणारी पण फारच कमी माणसं होती ते आपलपण टिकवणारी
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणा-या नात्यांची परीभाषाच काही वेगळी असते
फुले नित्य फुलतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो
मन वळु नये अशी श्रध्दा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरु नये अशी नाती हवी
काही नाती बांधलेली असतात सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपूनही पोकळ राहतात काही माञ आपोआप जपली जातात
चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे
नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात
भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही
नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं
कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही
पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात
काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात जाळी झाली तरी कायम हृदयात जपावीशी वाटतात
इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील इतक्याही दूर जाऊ नका की वाट पहावी लागेल आशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहील
Motivational Quotes In Hindi
Motivational Shayari In Hindi
Reality Life Quotes in Hindi
Struggle Motivational Quotes in Hindi
Life Shayari In Hindi
True Lines In Hindi
Real Life Quotes In Hindi
Mehnat Quotes In Hindi
Positive Thoughts In Hindi
Suvichar In Hindi
Suvichar Marathi
Golden Thoughts Of Life in Hindi
Motivational Quotes In Marathi
Safalta Quotes In Hindi
Sachi Bate Status In Hindi
Emotional Sad Quotes In Marathi
Reality Marathi Quotes On Life
Attitude Shayari In English Hindi
Abdul Kalam Quotes In Hindi
Swami Vivekananda Quotes In Hindi
Buddha Quotes in Hindi
Chanakya Quotes In Hindi
Osho Quotes In Hindi
Buddha Quotes In Marathi
Good Morning Quotes in Hindi
Good Morning Quotes In Marathi
Good Night Quotes In Hindi
Good Night Quotes In Marathi
Broken Heart Quotes In Hindi
Breakup Quotes In Marathi
Love Quotes In Marathi
Love Quotes In Hindi
Love Shayari In English
Sad Quotes In Hindi
Success Quotes In Hindi
Marathi Ukhane For Female
Marathi Ukhane
Happy Anniversary Wishes In Hindi
Happy Birthday Wishes In Marathi
Jokes In Hindi