आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो आईकडे अश्रुचे पाट असतात बापाकडे संयमाचे घाट असतात ज्योतीपेक्षा समई जास्त तापते ठेच लागली की आईची आठवण येते मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते मुलगी बापाला जाणते किती ग्रेट असतो ना बाप